Skip to main content
गोवर - लक्षणे, लस आणि उपचार

गोवर - लक्षणे, लस आणि उपचार

गोवर - लक्षणे, लस आणि उपचार Aug 01, 2023

मुंबईत काही दिवसांपासून गोवर या अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजाराची साथ पसरली आहे.  डिसेंबर २०२३पर्यंत गोवर या आजाराचे उच्चाटन करण्याचे आपल्या देशाचे ध्येय असून त्याच्या एक वर्ष आधीच त्याची साथ पसरली आहे. ही आरोग्य अधिकाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे; कारण मुंबईच्या गोवंडी परिसरात १ ते ५ वर्षे वयोगटातील तीन मुलांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गोवर हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे जो गोवरच्या विषाणूमुळे होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण होते, तेव्हा संसर्ग दहा दिवसांपर्यंत टिकू शकतो. या दरम्यान त्या व्यक्तीला ताप आणि पुरळ याशिवाय कानांचा संसर्ग, अतिसार आणि न्यूमोनिया यांसारखे विविध रोग होऊ शकतात.

गोवरची लस का महत्त्वाची आहे ?

गोवर विरूद्ध लसीकरण झालेल्या मुलांची ताजी आकडेवारी सध्या सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. WHOच्या अहवालानुसार, भारताने २०१७-२०२० या काळात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेद्वारे ३२४ दशलक्ष मुलांचे लसीकरण केले आहे. गोवर विरूद्ध लसीकरण अत्यंत प्रभावी आहे आणि लसीकरण केलेल्या मुलास हा आजार होण्याची शक्यता कमी आहे. हेच मुख्य कारण आहे की सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून MR (गोवर-रुबेला) लस मोफत दिली जाते. प्रत्येक प्रदेशातील बहुसंख्य मुलांना गोवरचे लसीकरण केल्याशिवाय गोवर भारतातून नाहीसा होऊ शकत नाही यात शंका नाही.

गोवर कसा पसरतो ? 

गोवर हा संसर्ग झालेल्या मुलाच्या किंवा प्रौढ व्यक्तीच्या नाक आणि घशातून उद्भवणाऱ्या विषाणूमुळे होतो.  त्यामुळे त्यात तीव्र संसर्गजन्य होण्याची क्षमता असते. याचा अर्थ असा की जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलतो तेव्हा थेंब हवेत पसरतात. परिणामी, जेव्हा इतर लोक श्वास घेतात तेव्हा त्यांना संसर्ग होऊ शकतो. दैनंदिन परिस्थितीमध्ये संसर्गजन्य थेंब सुमारे एक तास हवेत  तरंगू  शकतात, म्हणूनच रूग्णाचे विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे.

 

 

गोवरची लक्षणे काय आहेत ?

हा फ्लूचा प्रकार असल्याने लक्षणे नेहमीच्या फ्लूसारखी असतात – खूप ताप, थकवा, तीव्र खोकला, डोळे लाल होणे  आणि वाहणारे नाक. गोवरमुळे शरीरावर लाल पुरळ देखील येऊ शकतात, जे डोक्यापासून सुरू होतात आणि नंतर शरीराच्या इतर भागांवर पसरतात. गोवरच्या इतर काही लक्षणांमध्ये घसा खवखवणे, तोंडात पांढरे डाग, स्नायू दुखणे आणि प्रकाशाची संवेदनशीलता (प्रकाशामुळे संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यात वेदना होऊ शकतात) यांचा समावेश असू शकतो.

गोवर कसा रोखता येईल ? 

लसीकरण न केलेल्या कोणालाही गोवर होण्याचा धोका असतो. लसीचा शोध लागण्यापूर्वी जवळजवळ प्रत्येकाला हा आजार होऊ शकत होता. जर एखाद्या व्यक्तीचे गोवर लसीकरण झाले असेल तर ती व्यक्ती गोवरचा चांगल्याप्रकारे प्रतिकार करू शकते.  तथापि, विषाणूचा नवीन प्रकार आल्यास सर्व व्यक्तींना समान धोका असू शकतो.

गोवरसाठी उपचार काय आहेत ? 

सध्या गोवरवर कोणताही उपचार नाही. एखाद्या व्यक्तीला बरे होण्यासाठी विषाणूने त्याचा संक्रमण कालावधी पूर्ण करणे आवश्यक असते. हा कालावधी साधारणतः १० ते १४ दिवसांचा असतो. रुग्णावर उपचार करण्याच्या काही पद्धतींमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत :

  • वेदना किंवा ताप यांसाठी निर्धारित वेदनाशामक औषधे घेणे. पॅरासिटामॉल हे सहसा ताप, अंगदुखी इत्यादींसाठी दिले जाते. तथापि, जर रुग्ण गर्भवती असेल किंवा त्याचे वय पाच वर्षांपेक्षा कमी असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण या रुग्णांना वेदनाशामक औषधे देणे धोकादायक ठरू शकते.
  • भरपूर विश्रांती घ्या, कारण शरीराला बरे होण्यासाठी वेळ लागतो.
  • पुरेशी पेये पिणे आणि ठरावीक अंतराने मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे.
  • तुमच्या डोळ्यांना त्रास होत असल्यास तीव्र प्रकाश टाळा.
  • अ जीवनसत्त्वामुळे गोवरची गुंतागुंत कमी होऊ शकते. उदा. अतिसार आणि न्यूमोनिया
  • जर मूल गंभीर आजारी असेल आणि शक्यतो दुय्यम बॅक्टेरियाचा संसर्ग असेल तर, I.V. प्रतिजैविक उपचार प्रोटोकॉल म्हणून दिले जाऊ शकतात.
  • गरजेनुसार नेब्युलायझेशनसारख्या सहाय्यक उपचारांचा विचार केला जाऊ शकतो.
  • उपचार न केल्यास, गोवर प्राणघातक ठरू शकतो. मुख्यत्वे तो गर्भवतींमध्ये, २० वर्षांवरील प्रौढ, ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुले आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांमध्ये आढळल्यास तो जास्त गंभीर असतो.
     

Categories

Clear all

Quick Enquiry Form

barqut

Keep track of your appointments, get updates & more!

app-store google-play
Request callback